बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् मला नग्न होण्यास सांगितलं, प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे कुंद्राच्या अडचणी वाढल्या

मुंबई | शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिनं तिला आलेल्या काही धक्कादायक अनुभवांविषयी सांगितलं आहे.

लाॅकडाऊन काळात आलेल्या अनुभवाविषयी सांगताना सागरिकानं म्हटलं की, मला ऑगस्टमध्ये एका वेब सिरिजची ऑफर मिळाली होती. यासाठी मी होकार दर्शवला. यानंतर मला राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा फोन आला. वेब सीरिजसाठी ऑनलाईन ऑडिशन देण्याचं सांगण्यात आलं. ऑडिशनसाठी व्हिडीओ काॅल केल्यानंतर मला सगळे कपडे काढून नग्न होण्याची मागणी करण्यात आली. हे सगळं ऐकून मला धक्का बसला. मी नकार देत व्हिडीओ काॅल कट केला.

पुढे सागरिकानं म्हटलं की, या व्हिडीओ काॅलमध्ये मला तीन जण दिसत होते. त्यातला एकाचा चेहरा लपवलेला होता. जर या अश्लील व्हिडीओ रॅकेटमध्ये राज कुंद्रा सहभागी असेल तर त्याला अटक करा आणि या रॅकेटचा पर्दाफाश करा. या अश्लील चित्रपटांचं मोठं रॅकेट असल्याचंही सागरिकानं म्हटलं.

दरम्यान, मंगळवारी मुंबई गुन्हे शाखेची टीम राज कुंद्राला न्यायालयात हजर करेल. राजविरूद्ध त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथलाही अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे झारीतले शुक्राचार्य”

धक्कादायक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिलेला कोरोनाच्या दोन्ही व्हेरिएंटची लागण

पुण्यातील ‘त्या’ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट, नगरसेवकाचं नाव आल्यानं खळबळ

व्हॉट्सअप चॅटमधून राज कुंद्राच्या ‘या’ धक्कादायक गोष्टी आल्या समोर

मोदींचं मराठीत ट्विट; पांडुरंगाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More