बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कवठेमहांकाळ पुन्हा हादरलं, उपसरपंचाच्या खुनानंतर आता…

सांगली | सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यात दोन दिवसांपुर्वीच पांडूरंग काळे या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला होता. यानंतर तालुक्यात आणखी एक जीवघेणा हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर यांना दोन अज्ञात हल्लेखोरांनी भोसकलं आहे.

कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात ही घटना घडली. अमर आटपाडकर यांच्या पोटावर, छातीवर, डोक्यावर तसच शरीरावर बाकी ठिकाणी वार करून आरोपी पसार झाले आहेत. अमर यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केले आहेत. आता पुढील उपचारासाठी त्यांना मिरजला हलवण्यात आलं आहे. डाॅक्टरांनी अमर यांची प्रकृती गंभीर आणि नाजूक असल्याची माहिती दिली आहे. तर या हल्ल्यात अमरचा मित्र विजय मानेही जखमी झाला आहे.

याआधी दोन दिवसांपुर्वी सांगलीत उपसरपंच पांडूरंग काळे यांची निवडणुकीतील वादातून 4 मार्चला हत्या झाली होती. ते भाजप पक्षाचे होते. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांची हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. सांगलीत कवठेमहांकाळ पोलिसांनी जवळपास 39 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांमुळे बोरगावात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, उपसरपंच निवडणुकीवरून झालेल्या वादात पांडूरंग काळे यांना मृत्यूला कवटाळावं लागलं. यावेळी राष्ट्रवादीचे दोन सदस्यही जखमी झाले होते. यामुळे गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये होणारं राजकारण कुठल्या पातळीवर पोहचलं आहे हे दिसत आहे.

थोडक्यात बातम्या

…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ

‘तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोनाची लस घेतल्यावर सैफ होतोय ट्रोल!

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा

…तर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही- संजय राऊत

‘…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात’; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More