भर संसदेत ‘अशा’ पद्धतीनं मोदींनी केलं पठाणचं कौतुक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बाॅलिवूडचा(Bollywood) बादशाहा शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या चित्रपटाला रलीज होण्यापूर्वीच विरोध करण्यात आला होता, परंतु तरीही हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

चित्रपट पाहायला अफाट गर्दी होत असली तरी अजूनही पठाणला काहींचा विरोध कायम आहे. सोशल मीडियावरू अजूनही या चित्रपटावर टीका केली जात आहे. काही राजकीय नेत्यांचाही या चित्रपटाला विरोध कायम आहे.

कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर पठाण चित्रपटानं अनेक चित्रपटांचे रेकार्ड तोडले आहे. जे थियेटर्स कधी हाऊसफुल्ल होत नव्हते ते आता पठाणच्या निमित्तानं हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. पठाणच्या कमाईचा आकडा आता ४०० करोडच्या पुढं गेला आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही(Narendra Modi) गुरूवारी संसदेत पठाणचं भरभरून कौतुक केलं आहे. श्रीनगरमधील एक थियेटर तब्बल ३२ वर्षांनी पठाणमुळं हाऊसफुल्ल झालं आहे, हाच मुद्दा उपस्थित करत मोदींनी पठाणचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, जेव्हा चित्रपटाचं बेशरम हे गाणं रिलीज झालं होतं तेव्हा अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पठाणवर टीका केली होती. आता मोदींनीच पठाणचं कौतुक केल्यानं विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-