बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन् महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कॅप्टन झाला’; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

मुंबई | बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना नेहमीच क्रिकेटबद्दल खास प्रेम राहिलं आहे. बीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. नुकताच पवार यांनी एका कार्यक्रमात माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी काही जुण्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपद कसं मिळालं, याबद्दल पवारांनी सांगितलं आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, भारत विरुद्ध इंग्लडचा सामना सुरु होता. त्यावेळी भारताच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन राहुल द्रविड होता. राहुलने यावेळी मला कर्णधारपदामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचं सांगितलं.

यानंतर संघाचं कॅप्टनपद कोण संभाळेल, असा प्रश्न उभा राहिला होता. मी सचिनला पुन्हा कर्णधार पदासाठी विचारलं पण त्याने नकार दिला. मग मी सचिनलाच विचारलं की पुढील कॅप्टन म्हणून कोण योग्य राहिल? यावेळी सचिनने महेंद्रसिंग धोनीचं नाव सुचवलं.

धोनीच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा दिल्यास तो देशाचं नाव उज्वल करेल, असं सचिनने सांगितलं. यानंतर धोनीने देखील खरंच क्रिकेटमध्ये देशाचं नाव उज्वल करून दाखवलं, असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना संदर्भात देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर!

भारतात दिल्या जाणाऱ्या ‘या’ लसीला ब्रिटनकडून मान्यता नाहीच!

ओवैसींच्या दिल्लीतील निवासस्थानाची जमावाकडून तोडफोड, 5 जण पोलिसांच्या ताब्यात

तालिबानी सत्तासंघर्ष टोकाला, दोन्ही सर्वोच्च नेेते गायब

…मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More