बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अन् आता आम्ही थांबणार नाही, लोकसभाही लढू”

मुंबई | पाच राज्यांच्या रणसंग्राम सुरु असून संपूर्ण देशाचं लक्ष निकालांवर लागलं आहे. अशातच पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप आघाडीवर पहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेला मात्र या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे. यावरुन महाराष्ट्र राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे.

महाराष्ट्राबाहेर सत्ता विस्तार करण्याच्या निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेनेचा निर्णय फ्लाॅप ठरत असून शिवसेनाचा फ्लाॅप शो झाला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच शिवसेनेला फ्लाॅप म्हणणाऱ्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.

आधी धडपड करावी लागते आणि ती आम्ही केली. आता आम्ही थांबणार नाही. आता लोकसभा लढू. सुरुवात केली आहे. आता अजून चित्र स्पष्ट व्हायला 2 वाजतील. बघू काय होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या पोस्टल मतमोजणी झाली, अद्याप इतर मतमोजणी बाकी आहे आताच कुठे मतमोजणीला सुरवात झालीय. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात 5 वाजेपर्यंत स्पष्ट चित्र कळेल, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”

मोठी बातमी! निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर

‘उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन; आपकडून काँग्रेसचा सुपडा साफ

“येत्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More