अन् ‘या’ दिवशी सलमान बिग बाॅसला करणार रामराम?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| टीव्हीवरील बिग बाॅस(Bigg Boss) हा सर्वांचा आवडता शो आहे. या शोचे नवनवीन एपिसोड पाहण्यास प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यातच सलमान खान(Salman Khan) हा शो होस्ट करत असल्यानं हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे.

सलमान अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. काहीजण तर हा शो फक्त सलमानसाठी पाहत असतात. त्यातच आता सलमान बिग बाॅस 16(Bigg Boss 16) मधून एक्झिट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सलमानचा नवीन वर्षात म्हणजेच 12 जानेवारीला बिग बाॅससोबतचा करार संपणार आहे, अशा चर्चा आहेत. त्यामुळं 12 जानेवारी नंतर सलमान या शोमध्ये दिसणार नाही, अशा चर्चा आहेत.

जर शोचा करार पुन्हा सलमानसोबत यशस्वी ठरला तर सलमान शोमध्ये दिसेल. परंतु जर सलमान या शोमधून एक्झिट झाला तर त्याच्या जागी करण जोहरची(Karan Johar) वर्णी लागणार असल्याच्या चर्चा आहेत.

परंतु सलमान खरच हा शो सोडणार आहे का?, याबबात कलर्स वाहिनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान, सलमान येणाऱ्या नववर्षात मनीष शर्माच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाचे शूटिंगही पुन्हा सुरू करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-