Top News महाराष्ट्र मुंबई

…अन् पुन्हा एकदा भर कार्यक्रमात नेहा कक्करला कोसळलं रडू, सारेच झाले स्तब्ध!

Picure Courtesy: Youtube/ Screenshot of video

मुंबई | सोनी टिव्हीवर चालू असलेला इंडियन आयडल या रियालटी शो मध्ये एकेकाळी प्रसिद्ध असलेले गीतकार संतोष आनंद यांनी त्यांची जीवन गाथा सांगितली. यावेळी या शोची जज आणि प्रसिद्ध गायक नेहा कक्करला तिचे अश्रू अनावर झाले नाही. एवढच नाही तर नेहाने त्यांना 5 लाख रुपयांची भेट दिली आहे. तसेच इंडस्ट्रीकडून त्यांना काम देण्याची मागणी सुद्धा तिनं केली आहे.

संतोष आनंद यांचं दुःख ऐकून नेहाने जेव्हा त्यांना 5 लाख रुपयांची भेट देण्याचं घोषित केलं तेव्हा त्यांनी ती भेट घेण्यास नकार दिला. मी खुप स्वाभिमानी असून त्यांनी कधी कोणाकडून 1 रुपयासुद्धा घेतला नाही, असं संतोष आनंद यांनी सांगितलं. त्यानंतर नेहा म्हणाली की ही भेट तुमच्या नातीकडून आहे, तेव्हा संतोष आनंद यांनी ते मानधन स्वीकारलं.

संतोष आनंद यांनी लिहिलेल्या गाण्यांपैकी ‘एक प्यार का नगमा है’ हे त्यांच्या गाण्यांपैकी एक गाजलेलं गाणं आहे. मात्र सध्या त्यांना कोणी काम देत नाही आणि यामुळे माझ्याकडे पैसे नसल्याचं देखिल त्यांनी इंडियन आयडलच्या मंचावर स्पष्ट केलं. त्या काळी एका उडत्या पक्षासारखं ते मुंबईला येत असून आता खुप काळ लोटून गेल्यानंतर शो निमीत्त ते मुंबईला पुन्हा आल्याचं संतोष आनंद म्हणाले.

रात्रभर जागून आपल्या रक्ताची शाई करुन संतोष आनंदांनी गीत लिहिलं असून ते दिवस आठवले तरी कुप छान वाटत, असंही संतोष आनंद म्हणाले. “हथियार तुटते है, लेकीन हौसला नही”, असं त्यांनी नेहमी सगळ्यांना सांगितलं असून त्यांचे पाय चार वेळा तुटले मात्र काळीज कधीच नाही असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, संतोष आनंद यांच्याकडे आज काही नाही, मात्र खुप काही आहे. त्यांना नेहमी असं वाटायचं की त्यांच्या गाण्यांच्या साहाय्याने ते जग जिंकतील, मात्र आता संतोष आनंद चुकीचा होता हे त्यांना कळालं आहे, असं संतोष आनंद म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘मी गायब नव्हतो तर या काळात मी…’; संजय राठोडांनी दिलं स्पष्टीकरण

15 मेपासून व्हाॅट्सअप वर मेसेज पाठवता येणार नाही!, जाणून घ्या नविन पाॅलिसीबाबत

आई रागावल्यानं मुलगी घराबाहेर पडली, नराधमांच्या कृत्यानं माणुसकी ओशाळली!

सनी लिओनीमुळे नेटकरी घायाळ, ‘हे’ फोटो पहायला वन मिलियन लोकांच्या उड्या…

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी धोका, असं म्हणत शेतकरी बाप-लेकानं संपवलं आयुष्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या