Top News

…अन् रोहित पवार अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावले!

मुंबई | कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हे नेहमी चर्चेत असतात. तर आता अपघातग्रस्तांची मदत केल्याप्रकरणी रोहित पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

बुधवारी मांडवे- पिंगळी दरम्यान शेतकऱ्याचा अपघात झाला होता. या शेतकऱ्याची व्हॅन रस्त्याच्या खाली काट्यामध्ये जाऊन फसली होती. हा अपघात पाहताच क्षणाचाही विलंब न करता रोहित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रोहित पवार यांना थांबून अपघातग्रस्त शेतकऱ्याची मदत केली. त्यांनी स्वतः काट्यात गेलेली गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केलीये. रोहित पवार यांच्या या कार्याचं अनेकांनी कौतुकंही केलंय.

या अपघातात तो शेतकरी जखमी झाल्यामुळे काट्यात गेलेली अपगातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. दरम्यान, ‘पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो,” असं आवाहन देखील त्यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या-

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय; पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन

“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

वीज बिलांवरुन नितेश राणेंची ठाकरे सरकारवर खोचक टीका, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या