बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् रुपाली ठोंबरे म्हणाल्या ‘…हेच आहेत पवार साहेबांचे संस्कार’

पुणे | केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit shah) हे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे भाजपाला पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल असं पक्षाला वाटतं. अमित शहा पुण्याच्या दौऱ्याला आल्यामुळे आता त्यांचा मुक्कामही पुण्यात असणार आहे.

गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा (amit shah) पुण्यात मुक्कामी आहेत मात्र त्यांच्या राहण्याची व्यवस्था न झाल्याचं समजताच राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करुन दिली. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांनी ट्विट करत पवारांचं कौतुक केलं आहे.

‘देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होत असल्याचं कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट माननीय अमित शाह यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिले आहे. हेच आहेत शरद पवार साहेबांचे संस्कार’, असं म्हणत रुपाली ठोंबरे यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

दरम्यान, अजितदादांनी तातडीने सर्किट हाऊसमधील (pune circuit house) आपला व्हीव्हीआयपी (VVIP) सूट अमित शहा यांच्यासाठी उपलब्ध करून दिला. अमित शहांना राहण्याची सोय शक्य नसल्यानं शासकीय अधिकाऱ्यांनी थेट अजितदादांनाच फोन करून ही गोष्ट कानावर घातली आणि अजितदादांनी त्यांच्या मुक्कामाची सोय करुन दिली.

 

थोडक्यात बातम्या – 

अजितदादांचा दिलदारपणा! एका मिनिटात केली अमित शहांच्या मुक्कामाची सोय

सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

भारतीय संघाला मोठा धक्का; विराटनंतर आता आणखी एकाचा राजीनामा

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झाला नाही”

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More