Top News

…आणि शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात घेतला उखाणा!

इंदापुर |  असं एक क्षेत्र नसेल जिथे शरद पवारांचा वावर नसेल. याचा प्रत्यय आज इंदापुरकरांना आला असेल. आज पवारांचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला.

नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात…! असा उखाणा त्यांनी जाहीर कार्यक्रमात घेऊन कार्यक्रमात एकच रंगत आणली. पवारांनी उखाणा घेताच सभेमध्ये सर्वत्र खसखस पिकली.

इंदापूर बाजार समितीच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त महिलांसाठी विविध कार्य़क्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला पवारांनी उपस्थिती लावली. त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

शरद पवारांनी घेतलेल्या उखाण्यावर सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि हा उखाणा रेकॉर्ड करू नका नाहीतर आज बाबांना घराबाहेर झोपावं लागेल, असंही मिश्किलपणे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

पैसे तयार ठेवा! डेल स्टेनची भारताचा प्रशिक्षक होण्याची तयारी

-प्रियांका गांधीची पहिली सभा होणार महाराष्ट्रात?? हालचालींना वेग

तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर; पुणे पोलिसांना न्यायालयाने फटकारले

“…तर ही अण्णांची आत्महत्या असेल”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; 13 नगरसेवकांनी पक्ष सोडला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या