Top News देश राजकारण

…अन् नागरिकांनी नगरसेवकाला चक्क गटाराच्या पाण्यात बसवलं!

वाराणसी | स्थानिक नागरिकांच्या समस्या न सोडवणं एका नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं आहे. समस्या न सोडवल्यामुळे नागरिकांनी नगरसेवकाला थेट गटाराच्या पाण्यात बसवल्याची घटना घडली आहे.

वाराणसीच्या बलुवाबीरमध्ये ही धक्कादायक घटना आहे. नगरसेवक काम करत नसल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला खुर्चीवर दोरीने बांधत थेट गटाराच्या पाण्यात बसवलं आहे.

बलुवाबीर परिसरातील स्थानिक नागरीक गेल्या अनेक दिवसांपासून गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येची तक्रार घेऊन नगरसेवकाकडे जात होते. मात्र सातत्याने नागरिकांच्या समस्यांनकडे दुर्लक्ष केल्यानंतर नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

या नगरसेवकाचं नाव तुफैल अंसारी असं आहे. बऱ्याच दिवसांपासून गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास होत होता. मात्र नगरसेवकाने त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. अखेर त्याच पाण्यात नगरसेवकाला एका दोरीने खुर्चीवर बांधून बसवण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ व्यक्तीसोबत रोहित पवारांना लाँग ड्राईव्हला जायला आवडेल!

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या रूग्णांमध्ये गेल्या 4 दिवसांत लक्षणीय वाढ

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत; संजय राऊत यांची टीका

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, शॉकसाठी तयार रहा; मनसेचा सरकारला इशारा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या