…अन् हाती धुपाटणं आलं!, जिल्हाधिकारीपद सोडलेल्या भाजप उमेदवाराचा पराभव

रायपूर |जिल्हाधिकारीपदाची नोकरी सोडून भाजपच्या तिकीटावर उमेदवारी लढवणं एका आयएएस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. नोकरी तर गेलीच मात्र विजयही मिळाला नाही. 

ओ. पी. चौधरी असं या उमेदवाराचं नाव आहे. जिल्हाधिकारीपदाची नोकरी सोडून ते छत्तीसगडमध्ये भाजपच्या तिकीटावर उभे होते. 

छत्तीसगमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला आहे. त्यामध्ये ओ. पी. चौधरी यांचा देखील पराभव झाला आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र मतदारांनी आता काँग्रेसच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

-भाजप खासदार संजय काकडे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?, पवारांसोबत प्रवास केल्यानं एकच चर्चा

-ना हार मैं, ना जीत मै… शिवराज सिंहांनी वाजपेयी अंदाजात पराभव स्वीकारला

-कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

-वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!