नवी दिल्ली | जर आमच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर त्या कश्या पुर्ण करायच्या ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सरकारला दिला आहे.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीमध्ये सोमवारी एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपोषणाच्या एक दिवस आधी आंध्र प्रदेशला जायची गरज काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे उपोषण करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राहुल गांधींनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या-
–राहुल गांधींना ‘आऊट’ करण्याची जबाबदारी माझ्यावर- रामदास आठवले
–“मला बारामतीला बोलावता काय… मग येतोच मी”
-जो जातीचं नाव काढेन त्याला मी ठोकून काढेन- नितीन गडकरी
–‘तो’ चालू सामन्यात आला आणि धोनीचे ‘बुट’ पुसून गेला!
-शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं!