आंध्र प्रदेशात नेता आणि पोलीस गोळीबारात गंभीर जखमी!

हैदराबाद | आंध्र प्रदेशात प्रतिस्पर्ध्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन आपल्या पक्षाचा झेंडा लावण्याच्या प्रयत्नात झालेल्या गोळीबारात एक नेता आणि पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

गोळीबारात ठिक्का रेड्डी आणि पोलीस उपनिरीक्षक वेणूगोपाल यांच्या पायाला गोळी लागली आहे. या गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

मंत्रालयम भागामध्ये तेलगू देसम पक्षाचे नेते पी.ठिक्का रेड्डी यांनी जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाच्या असलेल्या भागात जाऊन झेंडा लावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा झटापटीदरम्यान अशी घटना घटली.

दरम्यान, दोघांना गोळ्या लागल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणार नाही; विनायक मेटे यांची भूमिका

मसूद अजहरला सोडण्यास सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचा पाठिंबा होता- शहा

‘मुका मोर्चा’ म्हणणाऱ्यांना मराठा काय असतो दाखवून द्या- अजित पवार

-खोटी दाडी-मिशी लावून आम्हाला शिवाजी-संभाजी सांगायचं काम करु नका- शिवसेना

सपना चौधरीनं खुलेआम मित्राला म्हटलं ‘आय लव्ह यू’…