बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलीवर बलात्कार… बापानं असा घेतला बदला की काळजाचा थरकाप उडेल

विशाखापट्टनम | आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममध्ये काळजाचा थरकाप उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील ६ लोकांची हत्या केली आहे. विशाखापट्टनमच्या जट्टादा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्याकांड झाल्यानंतर आरोपीनं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

पोलिसांच्या म्हणण्यानूसार दोन्ही कुटुंबामध्ये जुनी भांडणं होती आणि मृतांच्या परिवारीतील एका सदस्याचे आरोपीच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या घटनेमुळे पीडित मुलीच्या वडिलांना संताप अनावर झाला आणि त्यांनी हे हत्याकांड केलं. बलात्कारातील आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घडलेल्या अत्यंत धक्कादायक प्रकारामुळे पोलीस देखील हैराण असून, गांभीर्याने या प्रकरणी आरोपीनं नेमकं कशी एकाच परिवारीतील ६ सदस्यांची हत्या के,ली याचा तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच दहशत पसरली आहे. घटनेची माहिती काही क्षणातच संपूर्ण पंचक्रोशीत पसरली त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेनंतर परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आरोपीनं स्वतः पोलीस ठाणं गाठल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपीनं वापरलेलं धारदार शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केलं आहे.

पोलिसांनी यासंदर्भात प्राथमिक तपासात हाती आलेली माहिती सांगितली आहे. आरोपीनं बदला घेण्याच्या उद्देशानं एकाच परिवारील ६ सदस्यांवर हल्ला चढवला, यामध्ये परिवारीतील सहाही जणांचा मृत्यू झाला. मृतांबद्दलही पोलिसांनी माहिती दिली असून यामध्ये २ महिला, ३ मुलं आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आहे.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला, यामध्ये काही गोष्टी किंवा पुरावे मिळतात का याकडे पोलिसांनी लक्ष दिलं. आरोपीनं हत्या केलेले मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, सध्या ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत असून त्याने हा गुन्हा कसा केला याची माहिती घेत आहेत. आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या संतापातून त्याने हा गुन्हा तडीस नेल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पोलीस यासंदर्भात नक्की काय शोध घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महिन्याभरात कोरोना काय रुप घेईल?; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा

“सरकारने शालूच्या फोटोंवरील कमेंट्सवर लाॅकडाऊन लावावा”

महाराष्ट्रातील निर्बंध आणखी कडक होणार; सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही?

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू! मंदिरातून येताना दोन मुलींसोबत झालं मन हेलावून टाकणारं कृत्य

मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचारामुळे संतापलेल्या बापाने थेट आरोपीचं घर गाठलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More