दिवाळीत पगार न झाल्यानं अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

परभणी | दिवाळीत सरकारकडून पगार न मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

सुमित्रा भगवानराव राखुंडे असं गळफास घेतलेल्या महिलेचं नाव असून, परभणी जिल्ह्यातील, जिंतुर तालुक्यातील बोर्डी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

2008 ते 2017 पर्यंतचे रजिस्टर पीसीआरला दाखवण्याबाबत त्यांना सांगण्यात आलं होतं. हा त्रास सहन न झाल्यानं आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केलाय.

दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात अालेला नाहीय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या