महायुतीकडून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळाला धोका?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana l महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवली आहे. या योजनेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत. अशातच जाल्ली महिन्यापासून तब्बल अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनचा लाभ घेतला आहे.

या महिला मोबदल्यापासून वंचित :

मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबावणी करण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र त्यांच्या मोबदल्यापासून वंचित राहिल्या आहेत. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये देण्याचे महायुती सरकारने जाहीर केले होते.

मात्र ही योजना सुरू होऊन तब्बल पाच महिन्यांहून अधिक काल उलटला आहे तरी अजूनही अंगणवाडी सेविकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. मात्र आता अनेक महिने उलटूनही अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मोबदल्याचे पैसे न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Ladki Bahin Yojana l अंगणवाडी सेविकांना मोबदला मिळाला नाही :

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही जुलै महिन्यात सुरु झाली आहे. मात्र त्या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविकांवर देखील सोपवण्यात आलं होतं. परंतु, हे अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक अर्जामागे 50 रुपये देण्यात येतील असे सरकारने जाहीर केलं होतं. मात्र या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा हा त्यामागचा मूळ उद्देश होता.

याशिवाय अंगणवाडी सेविकांनी देखील नेहमीचं काम सांभाळत लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्याची कामगिरी देखील चांगल्या प्रकारे पार पाडली. परंतु, आता या योजनेच्या लाभापासून अंगणवाडी सेविका वंचित राहिल्या आहेत.

News Title –  Anganwadi Workers Await Due Payment on ladki bahin yojana

महत्त्वाच्या बातम्या-

CNG चा स्फोट अन् ‘इतके’ जण जीवंत जळाले, कुठे घडला हा भयंकर अपघात?

भाजपा म्हणजे नटरंगी नार, ‘या’ नेत्याची जहरी टीका

गुड न्यूज! आठवड्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

“संजय राठोडांचा काळा डाग शिंदेंच्या कपाळी”; नव्या बॅनरची जोरदार चर्चा

महागाईचा झटका बसणार? ‘या’ वस्तू महागणार

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .