बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक उन्हात तहानलेल्या माकडासाठी पोलीस कर्मचारी ठरला देवदूत, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | एप्रिल महिना सुरु झाला असून उन्हाचा (Summer) तडाका चांगलाच वाढल्याचं पहायला मिळत आहे. या उष्णतेमुळे अनेकांना गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच उन्हाळ्यात पक्षी आणि प्राण्यांची वणवण होत असलेली पहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्या व्यक्तीवर कौतुकांचा वर्षाव होत असलेला पहायला मिळत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पोलीस (Police) कर्मचारी एका तहानलेल्या माकडाला बाटलीनं पाणी पाजत आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबई -अहमदाबाद मार्गावरील घाटातील आहे. येथे तैनात केलेले वाहतूक पोलीस जवळपासच्या जंगलातून रस्त्यावर येणाऱ्या प्राण्यांना देण्यासाठी पाण्याच्या अनेक बाटल्या घेऊन जातात.

दरम्यान, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून पोलिसाच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे. त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. उन्हाळ्यात अनेक पक्षी-प्राण्यांचे पाण्यामुळे हाल होत असतात त्यामुळे प्रत्येकानं आपल्या घराशेजारी पाणी ठेवावं. जेणेकरुन पक्षी-प्रा्ण्यांना थोडी मदत होईल.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

उष्णतेचा कहर! उष्मघातामुळे राज्यात 3 जणांचा मृत्यू

अत्यंत धक्कादायक; कीवमध्ये सापडले तब्बल ‘इतके’ मृतदेह

टेंशन वाढलं! चीनमधून कोरोनाबाबत ‘ही’ धडकी भरवणारी बातमी समोर

‘शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे’; मनसेचा घणाघात

Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने केली या जबरदस्त प्लॅनची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More