बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेच्या अंगावर बसून मारहाण, पोलिसाच्या व्हायरल व्हिडीओनं देशभर संताप

कानपूर | उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी महिलेच्या छातीवर बसून तिला मारहाण करताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील घटना लखीमपूर येथील दुर्गदासपूर गावातील आहे. पुखराया पोलीस चौकीचे प्रमुख महेंद्र पटेल काही शिपायांसह एका आरोपीच्या घरी तपासासाठी चालले होते. तपासाला जात असताना पोलिसांनी शिवम नावाच्या तरूणाला आरोपीच्या घराचा पत्ता विचारला. यावेळी शिवम आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाला.

यानंतर शिवमच्या घरातील एक महिला तिथे आली, तेव्हा पोलिसांनी तिला मारहाण सुरु केली. त्याचवेळी महिलेची सून देखील तिथे आली. यादरम्यान दोघेही खाली पडले. यानंतर पोलीस कर्मचारी महिलेच्या छातीवर बसून तिला मारहाण करु लागला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ शिवमच्या कुटुंबातील एकाने शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कानपूरच्या एसएसपींनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस प्रशासनाविषयी अनेक सवाल उपस्थित केले जावू लागले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

चुकीला माफी नाही!, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

‘…त्या शाखाध्यक्षाच्या घरी स्वत: जेवायला जाणार’; राज ठाकरेंची अनोखी ऑफर

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

मनसे कात टाकतेय; पुण्यातून महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More