बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्याला राग अनावर; भररस्त्यात भाजप नेत्याचे कपडे फाडले, पाहा व्हिडीओ

जयपूर | राजस्थानमध्ये संतापलेल्या शेतकऱ्याने सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सामिल होण्यासाठी आलेल्या भाजप नेत्याचे कपडे फाडल्याची घटना घडली आहे. हुमानगडचे भाजप कार्यकर्ता आणि एसीसी मोर्चाचे अध्यक्ष कैलाश मेघवाल यांचे शेतकऱ्यांनी कपडे फाडले.

कैलाश मेघवाल यांचे कपडे फाडल्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत कैलाश मेघवाल यांची सुटका केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सौम्य लाठी चार्ज केला. यात काही शेतकरी जखमी झालेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्यानंतर यावरून राजस्थानमधील भाजप नेत्यांनी गेहलोत सरकारवर सडकून टीका केली आहे. याप्रकरणावर भाष्य करत भाजप नेते योगी बालकनाथन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

एका आठवड्यात दुसऱ्यांदा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुद्द्यावरून राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप राजस्थान एससी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कैलाश मेघवाल यांच्यावर हल्ला हा राजस्थानातील कायद्याच्या व्यवस्थेची वास्तविक स्थिती व्यक्त करतो. या हल्ल्याचा जितका निषेध केला जावा तितका कमी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“जनसामान्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला”

कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धुमाकूळ; इंग्लडमध्ये अलर्ट जारी

पुण्यातील ‘फुकट बिर्याणी’ ऑर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट!

‘आपला लोकशाही देश आहे, त्यामुळे…’; न्यायालयानं शिल्पाला सुनावलं

तळियेनंतर ‘या’ 13 गावांना मोठा धोका; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More