RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | राफेल कराराबाबत कोणतीही अनियमितता झाली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. त्यावर रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा अनिल अबांनी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. रिलायन्स समूहावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत हे सिद्ध झालं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

रिलायन्स समूह आणि माझ्यावर राजकीय हेतूने प्रेरित आणि खोटे आरोप झाले असल्याचं न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राफेल विमान खरेदीसाठी यूपीए सरकारनं जो करार केला होता, त्यापेक्षा तिप्पट रक्कम देऊन मोदी सरकारने करार केला, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला होता.

महत्वाच्या बातम्या 

-भारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी

-जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

-राफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

-निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर आणि….

-राहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं- मा. गो. वैद्य