तब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला!

धुळे | धुळ्यातील भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी (काल) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

गोटेंनी मुंबईतील पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती गोटे यांच्या निकटवर्तीयांनी दिली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल 26 वर्षांनी भेट झाली. 

लोकसभेसाठी धुळे मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा करीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा स्वपक्षाविरुध्द बंडाचा झेंडा फडकविला आहे.

दरम्यान, काही महिन्यापूर्वी धुळे महापालिका निवडणूक झाली. यावेळी अनिल गोटे यांनी भाजप विरोधात भूमिका घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

-युती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले

-बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी

-सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली! पाकिस्तानही आपल्या पुढे

-सोशल मीडियावर ‘उलटे कमळ’, भाजपविरोधात रासपची मोहीम

-समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित