नोटाबंदीनंतर आता अनिल बोकील यांचा मोदी सरकारला नवा प्रस्ताव!

मुंबई | नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर नोटाबंदीचे जनक अनिल बोकील यांनी मोदी सरकारला नवा प्रस्ताव दिला आहे. कामाचे तास 8 तासांवरुन 6 तास करावेत, असा हा प्रस्ताव आहे. 

नोटाबंदीमुळे रोजगार घटल्याचं पुढं आलंय. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. त्यावर उपाय म्हणून अनिल बोकील यांनी हा मार्ग सुचवला आहे. 

भारत उष्णकटिबंधीय देश आहे. साडेतीन ते चार तासच काम करण्याची इथल्या लोकांची क्षमता आहे. कामाचे तास 6 तासांचे केल्यास उत्पादकता वाढेलच शिवाय 25 टक्के रोजगार नव्याने निर्माण होतील, असं बोकील यांचं म्हणणं आहे.