“…त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार नाही”
मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणूकवेळी आघाडीतील मतं फुटल्याने, काँग्रेसकडून पक्षनिष्ठा आणि एकनिष्ठतेची अपेक्षा नाही. काँग्रेस ही गद्दाराचीच फौज आहे. त्यामुळे हे घडणार होतं, अशी टीका भाजप (BJP) आमदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर केली आहे.
काल विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेसला काही मतांची गरज होती. शिवसेनेनं मत देण्याचं आश्वासनही दिलं होत, पण मतं फुटल्यामुळे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत खांडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. पण याचे खापर मात्र भाजप नेते काँग्रेसवर फोडत असल्याचं दिसुन आलं.
काल विधानपरिषद निवडणुकीवेळी नाना पटोले हे नागपूरला पळुन गेले. जोपर्यंत काँग्रेस नेत्याचे खिसे गरम होणार नाहीत तोपर्यत ते महाविकासआघाडीतून बाहेर पडणार नाहीत, असा थेट आरोप अनिल बोंडे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत विजयी ठरलेले काँग्रेस नेते भाई जगताप यांना मतं फुटल्याचं विचारलं. यावर बोलताना कोणताही प्रकार सहन केला जाणार नसून यासंबधी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.
थोडक्यात बातम्या
“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”
एकनाथ शिंदे ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता; महत्त्वाची माहिती समोर
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?, विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! फडणवीसांची रणनिती यशस्वी, महाविकास आघाडीचे मतं फोडण्यात भाजपला यश
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनिया गांधींना ईडीकडून समन्स जारी
Comments are closed.