मुंबई | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या निवडणूकीत एनडीएने चांगलीच मुसंडी मारलीये.
बिहारमधील निवडणूकीचे एक्झिट पोल मात्र एनडीएच्या विरोधात होते. यावर भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर टीका केलीये.
अनिल बोंडे म्हणाले, “कालपर्यंत राजद पुढे येईल अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता भाजप आणि जदयूला मतदारांनी स्वीकारलंय. मुळात बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलं आहे.”
बोंडे पुढे म्हणाले, “नितीशकुमार यांनी बिहारमध्ये तर पंतप्रधान मोदींनी देशभरात परिवर्तनाचं उत्तम काम केलंय. यामुळेच सर्व सामान्य जनतेने एनडीएला कौल दिलाय. तर काँग्रेस आणि राजदला बिहारच्या जनतेने नाकारलंय.”
महत्वाच्या बातम्या-
“पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी”
बिहार निवडणूक निकाल- चिराग पासवान किंग मेकर ठरणार का?
पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा
बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी
बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत
Comments are closed.