नाशिक | राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हे दाखल करा’, असे आदेश राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नाशिकच्या जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. यापुढे विमा कंपनीचा एक अधिकारी कृषी अधिक्षक कार्यालयात बसणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बी-बियाणे आणि खतांमध्ये भेसळ आढळल्यास दोषींवर सक्त कारवाई करणार असल्याचं बोंडेंनी सांगितलं आहे. यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-फसवणूक करून जमीन लुबाडणाऱ्या धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; शेतकऱ्यांनी धरले धरणे आंदोलन
-विराट कोहली म्हणतो, ‘या’ कारणामुळे काल भारताचा पराभव झाला!
-‘मी राजीनामा देणार म्हणजे देणार’; काँग्रेसमध्ये हालचालींना वेग
-नाच गाणे करणाऱ्या महिला वेश्याच असतात; खासदाराचे बेताल वक्तव्य
-‘मुंबई तुंबली आम्ही नाय पाहिली’; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा
Comments are closed.