परभणी महाराष्ट्र

“शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध”

परभणी | शरद पवार यांच्या पायाशी बसण्यासाठी राजू शेट्टी हे कृषी कायद्यांना विरोध करत असल्याची टीका राज्याचे माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे.

अनिल बोंडे परभणीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी अनिल बोंडे यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

आपल्याला महाविकासआघाडीत कुठेतरी स्थान मिळेल. यासाठीच राजू शेट्टींकडून लाळघोटेपणा सुरु असल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलंय.

नव्या शेतकरी कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, नवीन कृषी कायद्यांमुशे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल, शेतमाल नियमन मुक्त केला असल्याने शेतकरी आपला माल कुठेही विकता येत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा अनिल बोंडे यांनी केला.

थोडक्यात बातम्या-

बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या!

कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना मिळणार अतिरिक्त भत्ता!

ब्रिटनमधून दिल्लीत आले 7 हजार प्रवासी; प्रत्येकाचा घरी जाऊन सरकार करणार तपासणी

“काँग्रेसमध्ये कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल यासाठी मोठा गट तयार असतो”

भाजपाला टीकांचा ‘भारतरत्न’ द्यायला पाहिजे- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या