बुलडाणा महाराष्ट्र

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

बुलडाणा | अतिवृष्टी, कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दौरे करत आहेत. पवार साहेंबांबद्दल कौतुक असलं तरी पण म्हाताऱ्या बापाला का फिराव लागतं?, असं म्हणत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीये.

जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं, शरद पवारांच्या दौऱ्यांमुळे हे सरकार लायकीचे नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका अनिल बोंडे यांनी केलीये.

कृषी विधेयकाविषयी भाजपकडून सुरु असलेल्या जनजागृती मोहीमेसाठी बोंडे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते बोलत होते.

राज्याच्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे, हे भाजप ने कधीच म्हटले नाही. मात्र, कपटीपणाने सत्तेवर आला आहात तर सरकार चालवून दाखवा. जनतेची कामे करा, जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते पूर्ण करा, असं आव्हान अनिल बोंडे यांनी राज्य सरकारला दिलंय.

महत्वाच्या बातम्या-

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

“मी खुर्चीत बसतो, सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या”

भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार- नरेंद्र मोदी

“मैं देश नहीं झुकने दूंगा हेच मोदी सरकारचे ब्रीद आहे”

राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या