Top News मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे- अनिल देशमुख

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसाकडून सुरु आहे. या प्रकरणी अनेकांची चौकशी देखील करण्यात आली आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीये.

सुशांत आत्महत्येप्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर अनेक टीका केल्या जातायत. यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “मुंबई पोलीस त्यांचं काम करत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने सुरु आहे.”

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात तपास कुठपर्यंत आला आहे, आतापर्यंत किती आणि कोणाचे जबाब नोंदवले गेले, ही सगळी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलीये. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत 35 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. 14 जून रोजी सुशांत सिंगने आत्महत्या केली. दरम्यान या सगळ्या प्रकरणात बिहार पोलिसांनीही लक्ष घातलंय. बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन अंकिता लोखंडेची चौकशीही केली.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र-बिहार संघर्षादरम्यान पहिल्यांदाच मुंबई पोलिस आयुक्त मीडियासमोर, म्हणाले…

जगातील ‘ही’ मोठी कंपनी TikTok खरेदी करण्याच्या तयारीत!

“हिंदूंना धडा शिकवण्यासाठी…”,आपच्या निलंबित नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा!

बिहार-महाराष्ट्र आमनेसामने, त्या प्रकरणावरून नितीश कुमार थेट ठाकरे सरकारशी बोलणार!

उद्या लॉन्च होतोय जबरदस्त फिचरसह रेडमीचा नवा फोन, किंमत असणार फक्त 10 हजाराच्या आसपास!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या