मुंबई | बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असं मत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वक्त केलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
बिहार निवडणुकीत आम्ही 50 जागा लढवत आहोत. 2015 ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती, असं अनिल देसाई यांनी सांगितलंय.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. लोकांना कळतंय यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता, तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं. आम्ही आता बिहार निवडणुक लढवून याची परतफेड करणार आहोत, असं अनिल देसाई म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळं वळण, आरोपी आणि पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल
देशाच्या आर्थिक यंत्रणेला बळ मिळावं असं राहुल गांधींना वाटतच नाही- स्मृती इराणी
शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं- उद्धव ठाकरे