दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली!

Anil Desai Win | एकाबाजूला शिवसेना पक्षात उभी फूट पडली. पक्ष आणि चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. मात्र यामुळे विजय सोयीचा होईल असं शिंदे गट आणि भाजपला वाटलं होतं. मात्र याचा फायदा हा उद्धव ठाकरे यांना झाला असल्याचं दिसत आहे.  (Anil Desai Win)

अनिल देसाई विजयी

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली असल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटातून अनिल देसाई (Anil Desai Win) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली. अशातच एक्झिट पोलने राहुल शेवाळे विजयी होतील अशी माहिती दिली होती. मात्र घडलं उलटंच. यावेळी आता शिवसेना ठाकरे गटातून दक्षिण मध्य मुंबईत मशाल पेटली आहे. अनिल देसाई विजयी (Anil Desai Win) झाले.

मतमोजणीला सुरूवात झाली त्यानंतर राहुल शेवाळे हे आघाडीवर होते. मात्र अंतिम सत्रात अनिल देसाई हे आघाडीवर आले आणि राहुल शेवाळे यांना पिछाडीवर टाकलं आहे. मुंबईतील हा पहिला विजय ठाकरेंकडे खेचून आणला गेला आहे. पक्षफूटीनंतरची ही पहिली प्रतिष्ठेची लढत दोन्ही गटांसाठी होती.

यंदाच्या वर्षी मतदानात घट

2019 मध्ये 55.2 टक्के दक्षिण मध्य मुंबईत मतदान झाल्याचं समजलं जात होतं. मात्र यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये दक्षिण मध्य मुंबईतील मतदान हे गतवेळीच्या तुलनेत 1.62 टक्के मतदान कमी झालं. यंदाच्या वर्षी 53.60 टक्के मतदान झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Anil Desai Win Against Rahul Shewale At Mumbai South Central Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्य

मोठी बातमी! पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कंगनाला मोठं यश; उधळला विजयी गुलाल

महाराष्ट्र लोकसभा निकाल पाहा सर्वात आधी अवघ्या एका क्लिकवर!

मोदी महाराष्ट्रात येऊन त्यांना म्हणाले लहान भाऊ!, आता तेच 18 हजारांनी मागे

धाराशिवमध्ये मशाल पेटणार?; ओमराजे निंबाळकरांची विजयाची औपचारीकता बाकी

महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं; ‘या’ नेत्याने मारली बाजी