महाराष्ट्र सोलापूर

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली- गृहमंत्री अनिल देशमुख

सोलापूर | कोरोनाच्या विषाणू प्रसाराच्या काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचे मोठे काम केले, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोलापुरात काढले.

सोलापूर येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कोरोना योद्ध्यांच्या परिवाराला शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचे धनादेश आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख बोलत होते. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मृत झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.

कोरोनाविरूद्ध जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरीने पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. ही अभिमानाची बाब असून तीन महिन्यातील काम सर्वात उत्कृष्ट आहे. राज्यभरात कोरोनाने ५८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाची मदत मिळावी म्हणून ५० लाखांचे सानुग्रह अनुदान, १० लाख पोलीस महासंचालक सहायता निधी आणि ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्या बँकेकडून काही रक्कम असे ६५ लाख रुपये देण्याचे नियोजन केले. जे कर्मचारी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे,असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाची लागण झाल्यास पोलिसांना सर्व सोयीसुविधा असणाऱ्या दवाखान्यात उपचारांची सोय करण्यात आली आहे, पोलीस परिवारांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

महत्वाच्या बातम्या-

गुन्हे सिद्ध करण्यात लॅबचे महत्वपूर्ण योगदान, गृहमंत्री अनिल देशमुखांचे कौतुकोद्गार

रूग्णसंख्या कमालीची वाढतीये मात्र ‘ही’ गोष्ट राज्याच्या दृष्टीने सकारात्मक घडतीये- राजेश टोपे

“कोरोनाच्या संकटात शिवसैनिक घरात बसून राहिले तर मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन काम केलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या