Anil Deshmukh Attack | राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) यांच्या कारवर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला. काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक असताना ही घटना घडली आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सव्वा 8 वाजता ही घटना घडली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी अनिल देशमुख हे नरखेड येथे सभेत आले होते.सभा संपल्यावर कटोलकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 4 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. (Anil Deshmukh Attack)
देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. अनिल देशमुख हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. मोठा दगड गाडीच्या समोरील काचावर फेकला गेला. यामुळे काचेला तडा गेला आणि त्यानंतर एक दगड थेट देशमुख यांच्या कपाळावर लागला. यावेळी हल्ला करणाऱ्यांनी ‘भाजप जिंदाबाद’ आणि ‘अनिलबाबू मुर्दाबाद’ अशा घोषणा देखील केल्या. घोषणा देऊन हल्लेखोर मोटारसायकलीवरून फरार झाले, असं उज्ज्वल भोयर म्हणाले आहेत.
भाजपकडून स्टंटबाजीचा आरोप
या घटनेनंतर देशमुख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस आता अॅक्शन मोडवर आली आहे. हल्ला करणाऱ्यांचा पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. या हल्ल्यामागे भाजपचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव ( Anil Deshmukh Attack ) निर्माण झाला होता. भाजपाने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला आहे. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपाचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी केलाय.
News Title : Anil Deshmukh Attack update
महत्वाच्या बातम्या –
प्रेमविवाहाला संमती ते नोकरीच्या नव्या संधी.. आज ‘या’ राशींना ग्रहमान देतील साथ!
राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याने राजकीय संन्यासाची केली घोषणा!
रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी जाहीरच करून टाकलं
चंद्रकांत पाटलांचं कोथरूडकरांना आवाहन, म्हणाले…
नवऱ्याकडून छळ झाला सांगताना भाजप उमेदवाराला रडू कोसळले?