Anil Deshmukh । बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूआधी त्याची मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येमुळे बरीच चर्चा झाली. यावर अद्यापही तपास सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिशा सालियनप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलेल्या दाव्यावर सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे. वेळ आल्यावर मी पुरावे सादर करेल. वेळ आल्यावर मी नवे पुरावे सादर करणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. तसेच त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा नवा कलगीतुरा रंगला आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं आहे. श्याम मानव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यांबाबत अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंना अडकवण्याचा दावा श्याम मानव यांनी केला. यावेळी बोलत असताना हे कटकारस्थान खुद्द देवेंद्र फडणवीस यांचंच असल्याचा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.
तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिल्याने माझ्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई करण्यात आली होती, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं अनेकदा देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला होता. त्यातील चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्रक देण्यास सांगितलं असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
अशी तीन-चार प्रतिज्ञापत्रक माझ्याकडे पाठवण्यासाठी सांगितलं होतं. त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की, मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही. मी प्रतिज्ञापत्रक करून न दिल्याने त्यांनी माझ्यावर ईडी आणि सीबीआय लावली आणि मला अटक करण्यात आलं.
“माझ्याकडे पुरावे आहेत”
अजित पवारांवर गुटख्याचे आरोप लावायचे. अनिल परबांवरही खोटा आरोप लावायचा अशी प्रतिज्ञापत्र करण्यास मला सांगितलं होतं. मी त्याला नकार दिल्याने माझ्यावर कारवाई झाली होती. हे सर्व मला त्यांनी सांगितलं होतं. त्याचे माझ्याकडे पुरावे असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
News Title – Anil Deshmukh Claims Devendra Fadanvis About Disha Saliyan Case Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
“दरेकरांनी कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखे दिसतील”; जरांगे पाटील यांची टीका
“लग्न मोडलं, डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या…”, किरण गायकवाडने केला गौप्यस्फोट
रेल्वेमध्ये मेगा भरती! 7 हजारांपेक्षाही अधिक पदे भरली जाणार, ‘असा’ करा अर्ज
बालभारती पुस्तकातील ‘वन्समोअर’ शब्दावरून वाद; शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलं स्पष्टीकरण
“सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण..”; जरांगे पाटलांचा आता थेट PM मोदींवरच हल्लाबोल