बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीची अनिल देशमुखांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्या कोटींची संपत्ती जप्त

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. 1 कोटी 54 लाख रुपयांचा वरळीतला फ्लॅट आणि 2 करोड 67 लाख रुपयांची उरणमधील धुतुम गावातील जमीन जी सलील देशमुख यांच्या कंपनीच्या नावावर होती ती जप्त करण्यात आली आहे.

ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देऊन ते चौकशीला हजर राहीले नव्हते. पण ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने आतापर्यंतच्या तपासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही मुलांची चौकशी केली जाऊ शकते.

दरम्यान, ईडीने आधी मुंबई आणि नागपूर मधील कार्यालयांवर छापे टाकले आहेत. देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत आहेत. मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे याने सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे मोठे खुलासे केल्याचं समजत होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

शुभमंगल सावधान! अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात

“तिसऱ्या लाटेला सामोरे जायला आपण सज्ज असलो, तरी पुण्यातील निर्बंध कायम राहणार”

“बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील”

‘पुण्याची मस्तानी जगात भारी, तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

ते तर केवळ… पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबात धक्कादायक गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More