महाराष्ट्र मुंबई

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

मुंबई | राज्यात सध्या कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात, असं म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कोरोनाच्या लढाईत जिंकण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. आम्हाला आता राजकारण करायचं नाही, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

कोरोनाच्या लढाईत पोलीस, डॉक्टर्स, नर्स तसेच सफाई कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांचा सरकारला अभिमान आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.

दरम्यान, पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला तातडीने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरीही देण्यात येईल, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

दुसरा प्रस्ताव दिलाय, राज्यपाल विचार करतो म्हणाले- जयंत पाटील

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक; पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

’20 हजार कोटी द्या’; अशोक चव्हाण यांची नितीन गडकरींकडे मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या