Top News

आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही; गृहमंत्र्यांचा केंद्र सरकारला इशारा

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या पाच तासात केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

केंद्र सरकारकडून एनआयएला तपास देणे हे घटनाबाह्य असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य शासन बघ्याची भूमिका घेणार नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे. ते मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा हटवण्यावरुनही देशमुखांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पवारांची सुरक्षा हटवण्यामागे षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सायबर क्राईम वाढत आहे. तसेच 8 हजार पोलिसांची भरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या