बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अनिल देशमुख मला असंच मधात बोलले होते आता ते…’; मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ

मुंबई | आजपासून विधानसेभेचं कामकाज चालू झालं आहे. विधानसेभेच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने आक्रमक भुमिका घेतली आहे. पहिल्याच दिवशी आता विधानसभेचं वातावरण तापलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांनी देखील भाजपला आक्रमक उत्तर दिलं आहे.

सुधीर मुनगंटीवार विधानसभेत नियमांच्या संदर्भात बोलत होते. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना बोलू दिलं नाही. त्यावर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. अनिल देशमुख असचं मला बोलले होते, आता आत जात आहे. त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलं. तर तुम्ही काही सरकारची चमचेगिरी करण्यासाठी बसले आहात का?, असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलं. त्यावरून सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी तात्काळ हरकत घेतली. ते बोलण्यासाठी उभे राहिले. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य चुकीचं आहे. भाजप सरकारला धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे का, असा आक्रमक सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी बोलण्यास सुरवात केली. त्यांनी देखील आक्षेप नोंदवत सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य काढून टाकावं अशी विनंती केली.

दरम्यान, पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही याचाच अर्थ काँग्रेसला काहीच किंमत नाही, सत्तेसाठी काँग्रेस काहीही करू शकतं, असंही मुनगंटीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सरकारच्या डोक्यात घालण्यासाठी हे पुस्तक आणलंय’; राम सातपुते आक्रमक

‘विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे’; कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची पोस्ट व्हायरल

‘ज्यांना आजवर कोरोना झाला नाही त्यांनी…’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More