बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख फरार ???; भाजपच्या आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी रूपयांच्या वसूली प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी सुरू झाली. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं असतानाही ते ईडीच्या कार्यालयात हजर होत नाहीत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे बेपत्ता आहेत, काही ठाऊक नाही, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांनी अनिल देशमुख कुठे आहेत. ते सांगायला हवं. आपल्या खात्यातली माणूस कुठे आहेत, हे माहिती नसणं म्हणजे नक्कीच पोलीस खात्यात काहितरी गोंधळ चालू आहे, हे स्पष्ट होतंय. देशमुख कुठे आहेत हे राष्ट्रवादीने सांगावं, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दरेकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रविण दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, अनिल देशमुख हे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या देशात,आपल्या राज्यातच आहेत, तसेच ते कुठेही फरार झालेले नाही आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर दरेकर आणि सोमय्या यांनी भाजपमधील फरार नेत्यांबद्दल बोलावं, असा टोला देखील नबाव मलिक यांनी लगावला आहे.

दरम्यान, तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या वसुली केल्याबद्दलचे आरोप लावले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख माध्यामांसमोर आले नाहीत.

थोडक्यात बातम्या-

गडकरींची टोलेबाजी! “आमदारांना मंत्री न झाल्याचं दु:ख आहे तर, मंत्र्यांना…”

मुलींना शिक्षण देण्यास तालिबानची परवानगी; मात्र घातल्या ‘या’ जाचक अटी

“अहो राऊत, तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात?”

भारताविरूद्ध पाकिस्तानची रणनीती! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

‘…पण ठाकरे सरकारने विश्वासघात केला’; भाजपची घणाघाती टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More