बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

नागपूर | अनिल देशमुख अटकेप्रकरणी आता प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकणात अनिल देशमुखांचा बळी दिला जात असून त्यांनी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कोणाला नेऊन दिले? हे सांगावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आंबेडकरांनी केलेल्या या दाव्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. आंबेडकर पुढे म्हणाले, अनिल देशमुखांचा या प्रकरणात बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र दुसरंच कोणीतरी असून ते पुढे येत नाहीत, अंसही ते म्हणाले आहेत. मात्र आंबेडकरांचा रोख नेमका कोणावर आहे? हे समजू शकलं नाही.

आंबेडकर पुढे म्हणाले, कलेक्शन तर झालं. मात्र तो पैसा अनिल देशमुखांकडे नाही. मग तो पैसा गेला कुठे? हे देशमुखांनी सांगावं. तेव्हाच अनिल देशमुख माफीचे साक्षीदार होऊ शकतील. असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, अनिल देशमुख यांना न्यायलायाने 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख सध्या 100 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर अनिल देशमुख यांचे चिंरजीव यांचांही अटकपूर्व जामिन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे.

थोडक्यात  बातम्या-

‘या’ शिवसेना नेत्याच्या घरी सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांकडून पर्दाफाश

मोठी बातमी! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब; नवाब मलिकांवर केलेल्या आरोपांनी खळबळ

“लोकांनी निवडून दिलं तर यांनी देशच विकायला काढला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More