बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला का जात नाहीत?; समोर आलं ‘हे’ कारण

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मागील काही दिवसांपासून ईडीच्या निशाण्यावर आहेत. देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. ईडीने देशमुख यांच्या कार्यालयासह घरावर छापेमारी केली आहे. पण अद्याप देशमुख यांनी यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत.

अनिल देशमुख यांनी नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाला चौकशीसाठी का हजर नाहीत, याचं कारण सांगितलं आहे. पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने त्यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाईमुळं ते पळत असल्याची धारणा चुकीची आहे. या प्रकरणामध्ये जर ईडी निष्पक्ष पद्धतीने तपास केला तर आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं न्यायालयात सांगितलं असल्याचं अनिल देशमुखांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

न्यायमुर्ती नितीन एम जमादार आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर युक्तीवाद करताना अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी म्हणाले की, अनिल देशमुख ईडी चौकशीपासून दूर पळत असल्याचा गैरसमज मी दूर करू इच्छितो. कसलाही वैयक्तिक हेतू नसलेल्या लोकांकडून देशमुखांची चौकशी करावी, असं देशमुख यांचे वकील चौधरी यांनी युक्तीवाद करताना म्हणाले आहेत.

दरम्यान, ईडी निष्पक्षतेच्या मूलभूत मापदंडाचे पालन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. म्हणून या प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप करावा. तसेच अनिल देशमुख यांना जबरदस्तीच्या कारवाईपासून सुरक्षा देण्यात आली पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

आला रे आला ‘लॉर्ड शार्दुल’ आला! ‘या’ खेळाडूच्या बदल्यात विश्वचषक संघात शार्दुलची एन्ट्री

पतीला दुहेरी जन्मठेप, पत्नीची हत्या कशी केली वाचाल तर काळजाचा थरकाप उडेल!

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

…तर 30 आमदारांचे तिकीट कापणार; भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा इशारा

“कुणीही येईल आणि तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More