बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख नॉट रिचेबल; ईडीकडून देशमुख कुटुंबाला समन्स, हजर न राहिल्यास…

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. 100 कोटी वसूलीप्रकरणी देशमुख अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अशातच आता ईडीने पुन्हा एकदा देशमुखांना समन्स बजावला आहे.

ईडीने देशमुखांना समन्स बजावत सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. देशमुखांसह त्यांची पत्नी आणि मुलगा ऋषिकेश याला देखील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीसाठी देशमुख कुटुंब हजर न राहिल्यास ईडी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

ईडीने देशमुख कुटुंबाला जरी पुन्हा समन्स बजावला असला तरी देखील देशमुख कुटुंब अद्याप नॉट रिचेबल आहे. यामुळे सोमवारी देशमुख कुटुंब चौकशीसाठी हजर राहणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ईडीने अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये 1 कोटी 54 लाख रुपयांचा वरळीतील फ्लॅट आणि 2 कोटी 67 लाख रुपयांची उरणमधील धुतुम गावातील जमीन जप्त केली आहे. ईडीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

थोडक्यात बातम्या –

मुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

स्तनपान करतानाचा फोटो शेअर करत ‘ही’ बडी अभिनेत्री म्हणाली…

बाबो! हाॅकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यास ‘हे’ सरकार प्रत्येक खेळाडुला देणार एवढे कोटी रूपये

रिलायन्स जियोने आणला सर्वात स्वस्त धमाकेदार प्लान; वाचा सविस्तर

“मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाय अन् आता परत आलाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More