बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते”; पवारांच्या या दाव्यानंतर देशमुखांच्या जुन्या ट्विटखाली गदारोळ सुरु

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर ट्विटरवर लोकांनी अनिल देशमुख यांचं एक जुनं ट्विट शोधून काढलं असून या ट्विटखाली आता एकच गदारोळ सुरु झाला आहे.

आयुक्तांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचं म्हटलं होतं, मात्र माझ्याकडे जी कागदपत्रं आहेत त्यानूसार ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ते कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते आणि त्यानंतर डॉक्टरांनी होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिल्याने ते १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होते, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

गृहमंत्री होम क्वारंटाईन होते त्यामुळे परमबीरसिंग यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं, मात्र ट्विटर यूझर्सनी अनिल देशमुख यांचं एक ट्विट शोधून काढलं आहे. या ट्विटमध्ये अनिल देशमुख पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत.

आता हे ट्विट चांगलंच वादात सापडलं असून शरद पवार खोटं बोलत असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे, तर गृहमंत्री होम क्वारंटाईन होते तर त्यांनी पत्रकार परिषद घेतली कशी?, असा सवाल काही जणांनी केला आहे. आता ट्विट डिलीट करु नका, असंही काही जणांनी म्हटलं आहे. एकूणच या प्रकारावरही आता स्पष्टीकरण देण्याची मागणी केली जात आहे.

अनिल देशमुख यांचं ट्विट-

 

महत्त्वाच्या बातम्या-

“त्या पत्रामागे खूप मोठं कारस्थान, परमबीर सिंहांना माफीचा साक्षीदार करणार”

परमबीर सिंग यांचे आरोप तथ्यहीन, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही- शरद पवार

अनिल देशमुख तेव्हा कोरोनामुळे रुग्णालयात होते, त्यामुळे…- शरद पवार

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात ‘इतक्या ‘लोकांचा सहभाग, एटीएसला मिळाली मोठी माहिती

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, उलट केंद्र सरकारच बरखास्त करा”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More