Top News मुंबई

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केलीये. दरम्यान पोलिसांकडे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिक चॅनलकडून करण्यात आलाय.

अर्णब यांना अटक केल्यानंतर भाजपतर्फे राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. या घटनेनंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख यांच्या सांगण्याप्रमाणे, “याठिकाणी कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाहीये. शिवाय महाराष्ट्र पोलीस हे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील.”

“अन्वय नाईक यांची केस बंद झाली होती मात्र त्यांच्या पत्नीने केस पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस परत सुरू करण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात,” आल्याचं देशमुख यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये- सुभाष देसाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

“गेल्या 20 वर्षात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला”

कोकणामधून शिवसेनेला हद्दपार करणार; नारायण राणेंचं वक्तव्य

कंगणा राणावतच्या अडचणींत वाढ; गीतकार जावेद अख्तर यांनी केला अब्रू नुकसानीचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या