महाराष्ट्र मुंबई

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांना अटक

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याविषयी स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरून जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

अग्रिमा जोशुआ हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल केले होतं. त्यासंदर्भात कारवाई करण्याआधी स्थायी समितीची कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्याचबरोबर एका महिलेवर आक्षेपार्ह टीका टिप्पणी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. उमेश जाधव व इम्तियाज शेख यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

ज्यांनी आक्षेपार्ह टीका व पोस्ट करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी अशा सर्वांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकावरून विनोदी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला घोडेबाजाराची सवय आणि पैशाचा उन्मात आहे- यशोमती ठाकूर

बारावीच्या निकालात ‘या’ मुलीने मिळवलेले गुण वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

“RSS ने धारावी कोरोनामुक्त केली असेल, तर नागपुरात संघाचं मुख्यालय, तिथे कोरोनाचा कहर कसा?”

‘गुगल भारतात इतक्या हजार कोटींची गुंतवणूक करणार’; सुंदर पिचई यांनी केली मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या