बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चौकशी पूर्ण होईपर्यंत अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या”

नवी दिल्ली | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे सरकारला हादरे बसत असताना भाजपने आता दोन मंत्र्यांना टार्गेट करत मिशन ‘अनिल’ सुरु केल्याचं दिसत आहे.

याचदरम्यान, सरकारला धक्का देणारी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी केली आहे. पोलिस अधिकाऱ्याने त्यावेळी तक्रार दिली नाही. जेव्हा ते पोलिस आयुक्त होते. त्यांनी त्यावेळीचं तक्रार केली पाहिजे होती, असं राशिद अल्वी एएनआयशी बोलत होते.

परमबीर सिंग जर पोलिस आयुक्त अजुनही राहिले असते, तर त्यांनी कदाचीत त्यांनी तक्रार केलीचं नसती, असा दावा अल्वी यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांचीदेखील चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?, असा सवाल संजय निरूपम यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

मराठवाड्यातील ‘हा’ जिल्हा संपूर्णत: लॉकडाऊन होणार; पालकमंत्र्यांनी दिले आदेश

बसा बोंबलत! ‘पॉर्न’ बघणाऱ्या मुलाला किम जोंगने दिली ‘ही’ शिक्षा

अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध- विनायक राऊत

शरद पवारांकडून गृहमंत्र्यांना क्लीनचीट, मात्र काँग्रेस म्हणते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More