बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमच्या अर्णबला जेलमध्ये टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग का?- अनिल देशमुख

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर विधानसभेत याचविषयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत होते. याप्रकरणावरून भाजप नेत्यांनी वझेंच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर अनेक आरोप केले. यानंतर या मुद्द्यावरून विरोधक आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली.

सचिन वाझे काळा का गोरा हे माहिती नाही, त्याचं आम्हाला काय सांगता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर तुमच्या अर्णबला आतमध्ये टाकलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर जळताय काय?, असं याप्रकरणावर निवेदन करताना अनिल देशमुख म्हणाले.

तुम्ही कुणाला वाचवत आहात?, असा सवाल गृहमंत्र्यांना विचारला. हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी आत्महत्या करत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! अज्ञात तरूणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल चोरला

‘त्या रात्री तावडे नावाच्या माणसाचा फोन अन्…’; मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली धक्कादायक माहिती

‘या’ उड्डाणपुलाला शरद पवारांचं नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी

“वझे बिझे वाजत गेेले, आम्हाला त्यांची भिती दाखवू नका”

मनसुख यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More