Anil Deshmukh | लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडला आहे. सर्वांनी निकालाचा आनंद देखील घेतला आहे. अपेक्षेहून महाविकास आघाडीला राज्यात चांगली मतं मिळाली असून सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने राज्यात 30 जागांवर मुसंडी मारली आहे. तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळवता आला. अशातच आता शरद पवार गटातील नेत्याने देवेंद्रजींमुळे भाजपचा पराभव झाला असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपला अपेक्षीत यश मिळालं नसल्याचं कारण हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असं अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले आहेत. दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Anil Deshmukh)
“भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस जबाबदार”
अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली हे लोकांना अजिबातच आवडलं नाही. यामुळेच राज्यामध्ये भाजप अपयशी ठरलं. मी म्हणालो होतो की राज्यात मोठा चमत्कार होईल. आता तोच चमत्कार झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले आहेत. तर विदर्भातही मोठं यश मिळालं आहे. आगामी रणनीती ही वरिष्ठ ठरवतील, राज्यात जसा चमत्कार झाला तसाच केंद्रातही व्हायला हवा, अशी अपेक्षा अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
सध्या भाजपला मंथनाची आवश्यकता आहे. राज्यातील भाजप सरकार जाण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचं अनिल देशमुख म्हणालेत. फडणवीस यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं ते जनतेला आवडलं नसल्याचं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे. एकाबाजूला 45 प्लस बोलत असताना चिंतन आणि मंथन करणं गरजेचं होतं, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विजयी जागा
राज्यात महाविकास आघाडीच्या 30 जागा निवडून आल्या आहेत. तर महायुतीत 18 जागा निवडून आणल्या आहेत. तर केवळ 1 अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी मिळवून ते अपक्ष खासदार झाले आहेत.
News Title – Anil Deshmukh Slam To Devendra Fadanvis About BJP Loss In Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
राज्यात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
INDIA आघाडीत सहभागी होणार?, चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
“काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका”
इंडिया आघाडी करु शकते सत्तेवर दावा, देशात असा पालटू शकतो खेळ
“माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार”; मनोज जरांगेंचा थेट इशारा