महाराष्ट्र मुंबई

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकाल तर….; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

मुंबई |  सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर ते खपवून घेणार नाही. त्यावर लगोलग तातडीने कारवाई केली जाईल. यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअ‌ॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

टिकटॉकवर अ‌ॅसिड अ‌ॅटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले गेले आहेत. या प्रकरणाचीगंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं, सायबर गुन्ह्यांप्रकरणी आतापर्यंत 410 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 213 जणांना अटक करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर मोठा परिणाम; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

आजारी वडिलांना घेऊन 7 दिवसांत 1200 किमी सायकल प्रवास; ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक

‘भाजपच्या रणांगणातून’ ही प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती गायब, राज्यभर चर्चांना उधाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या