मुंबई | एल्गार परिषदेच्या खटल्याचा तपास एनआयकडे देण्याचा निर्णय झाल्यानंतरही राज्य सरकारला एसआयटी नेमून देण्याचा अधिकार एनआयच्या कायद्यातील कलम 10 मध्ये आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते सोमवारी बोलत होते. त्यावर
कलम 10 नुसार समांतर चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारला असून, कायदेशीर सल्ल्यानंतर एसआयटी चौकशीबाबत निर्णय घेऊ, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.
केंद्राने सरकारने एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे असला तरी याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी असा सर्वांचा आग्रह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण त्याबाबत चर्चा करू, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक शरद पवार यांनी मुंबईत घेतली. एल्गारचा तपास एनआयएकडे देण्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद असल्याचंही समोर आल्याचा मुद्दा उपस्थित केला. पवारांनी या बैठतत एनआयएच्या कायद्यातील कलम 10 आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही सांगून, राज्य सरकारही या प्रकरणाचा तपास करु शकते, असं स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातम्या-
‘शिवाजीचे उदात्तीकरण: पड्यामागचे वास्तव’ पुस्तकावर बंदी घाला; भाजपची मागणी
मागच्या जन्मी पाप केलं तो ‘नगरसेवक’ आणि महापाप करतो तो ‘महापौर’ होतो- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांच्या #हिंमतअसेलतर आव्हानाची सोशल मीडियात उडवली जातेय खिल्ली
बाबांनो, लोटांगण घालतो पण आता तरी गप बसा- इंदोरीकर महाराज
सरकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करणार नाही- बच्चू कडू
Comments are closed.